October 28, 2008

अफूची गोळी

बेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.

होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल ते करु शकतो. त्याला इनोसंट म्हणणारया बिहारी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, नोकरी शोधायला आलेल्या गरीब बिचारया तरुणाकडे पिस्तूल कसे आले?

आजपर्यंत सर्वात जास्त रेलवे मंत्री बिहारी झाले आहेत. बिहार मधून मुंबईला जाणारया तरुणांना, बिहारात रोजगाराच्या संधी उपल्ब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्या त्या फक्त बिहारी रेल्वेमंत्र्यांनी सुरु केलेल्या, मुंबईला घेउन जाणरया रेल्वेगाड्या.

बिहारमध्ये अशी हत्यारे खुलेआम विकली जातात. अश्या राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्राबद्दल तोंडातून ब्र काढू नये. गेल्या ५०- ६० वर्षांत ह्या बिहारी नेत्यांनी, बिहारची वाट लावली नसती, तर त्या राहुल राजवर आज नोकरीसाठी,मुंबई गाठायची वेळ आली असती का?

आबा पाटील, मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहेत , हे चांगलेच आहेत. विलासरावांनी ही संधी साधून लगेच चौकशी सामिती स्थापन केली आहे. कारण गॄह खाते राष्ट्र्वादीकडे आहे. तिकडे शिवसेनेने, मनसेला ह्या मुद्दयावर सुद्धा बरोबर घेउन जाण्याचे नाकारले आहे.

राजने उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठी मनाची त्याला सहानुभुती निर्माण झाली होती. त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली आहे. फक्त नारायण राणे आणी छगन भुजबळ ह्यांनी त्यावेळी सरकारला, रेल्वे भरतीबाबत महाराष्ट्र सरकार, रेल्वे खात्याला तसेच रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे का, असे ठणकाउन विचारले होते.

पण आता ज्याप्रकारे बिहारी नेते एकत्र आले आहेत. काही वॄत्तपत्रे आणी सबसे तेज चॅनेल्सना हाताशी धरुन, ज्याप्रकारे हिंदी मिडीयात गरळ ओकली जात आहे, तेव्हा आता ह्या मुद्द्यावर समस्त मराठी नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. इस्त्रीचे कपडे दिवसाला तीन वेळ बदलणारे, चापून चोपून भांग काढून फिरणारे, दिल्लीतील, मराठी गॄहमंत्री आता काय भूमिका घेतात हे पहायला हवे.

मुंबई पोलिसांना ह्या बाबतीत पाठिंबा असला तरी, आर आर आबांची वक्तव्ये ही, राज ठाकरेंनी निर्माण केलेल्या, मराठी लाटेवर स्वार होऊन, त्याच्याकडे झुकणारी मते आपल्यापक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नांचा एक भाग वाटतात.

अशी वक्तव्ये करुन , त्यांनी बिहारी नेत्यांना एक अफूची गोळी रेडीमेड उपलब्ध करुन दिली आहे. ही अफूची गोळी, हे बिहारी नेते येत्या निवडणूकीत वापरतील आणी आधीच विकासापासून वंचित आणी सुन्न असलेली बिहारी जनता अजून बेशुद्ध पडेल.

उद्या, एखादा मराठी कामानिमित्त कोलकात्याला जाताना, त्याला मध्येच बिहारमध्ये, बिहार पोलिसांनी हकनाक उडवला तर?

2 comments:

  1. lekha changala aahe. aawadla.. fakta
    "मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते." he matra kahi khare vatat nahi. kadhikali he aikayacho paraMtu aata mumbai polisanchi ti laayaki nahi.

    ReplyDelete
  2. धन्यवाद गोपाळ,

    मुंबई पोलिसांचा दरारा होता, अजूनही आहे. असं मला वाटतं. पण तरीही आपण त्यांची तुलना स्कॉटलंड यार्डशी करतो, हेच मला चूक वाटतंय. अगदी ही तुलना मी केली असली तरी. भारतीय गोष्टींचे मूल्यमापन करायला फिरंगी फूटपट्टी लावण्याची, ही आपणा सर्वांची मानसिकता कधी जाणार?

    मुंबईच्या डबेवाल्यांची, सिक्स सिग्मा कार्यप्रणाली देशोदेशी आभ्यासली जाते,१९९८ च्या अणुचाचण्या आपण अमेरिकेच्या उपग्रहांना उल्लू बनवून घेतो आणि त्यातील रिझल्ट्स हे आजपर्यंतच्या, तश्या प्रकारच्या चाचण्यांतील उच्च पातळीचे मिळतात,चांद्र यानाशी संपर्क ठेवण्याकरिता आपण डीप स्पेस नेट्वर्क स्थापितो.

    अश्या व इतर अनेक घटनांमधून भारतीय क्षमता सिद्ध झाली असली तरी आपण अजूनही फिरंगी मापदंडांवर, भारतीय यश मोजू पहातो.

    बरं झालं तुम्ही अभिप्राय दिला, त्यानिमित्ताने, मला माझ्या चुकीच्या विधानाकडे( वरील संदर्भात) तटस्थपणे पहाता आलं.

    आपल्या अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!

    ReplyDelete