December 3, 2008

अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिला

मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.

आता पुलिसला सांगतोय मला मरु दया. माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.

अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.

असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.

पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.

अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?

पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.

7 comments:

 1. क्रमशः ..? पुढचा भाग..?

  ReplyDelete
 2. please have some respect for our brave men who sacrificed their lives for Mumbai! This is ridiculous!

  ReplyDelete
 3. मित्रा Anonymous,
  मी खर तर निनावी प्रतिसादांची दखल घेत नाही. ज्याला आपले नावसुद्धा दड्वावेसे वाटते त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तरीपण तुझा जसा गैरसमज झाला आहे तसा इतर कुणा वाचकाचा होउ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे.
  १.माझ्या लेखनाने हुतात्म्यांचा अपमान झालेला नाही. त्यांच्या प्रति असलेल्या आदरापोटी मी जो निर्णय घेतला आहे तो तुला इथे वाचायला मिळेल
  http://kalekapil.blogspot.com/2008/12/blog-post.html
  २. आता माझ्या लेखाविषयी. हा लेख /कथा एका गरीब मुस्लीम युवकाला पद्धतशीरपणे दहशत्वादाकडे कसे खेचले जाते ते दाखवते. त्यासाठी त्याला दिले जाणारे प्रशिक्षण, ब्रेन-वॉशिंग हे ही दाखवले आहे.
  त्यामुळे हे लेखन म्हणजे दहशतवादाचे उदात्तीकरण असे समजले जाण्याचा धोका पत्करुन मी केले आहे. महेश भट्टच्या चित्रपटाची कथा असावी असेही वाटेल!!
  आज १० दहशतवादी मेले. काश्मीरात रोज शंभर मरत असतील. तरीही दहशतवाद का संपत नाही? दारिद्र्य, बेकारी, शिक्षणाचा अभाव,तसेच धर्मश्रद्धेचा गैरफायदा घेउन ह्या अल्लड पोरांना दहशतवादाकडे ओढणारी एक यंत्रणा सुरु आहे. ही यंत्रणा उद्ध्वस्त केल्याशिवाय दहशतवाद संपेल का? पंजाबातील दहशतवाद मतपरिवर्तानेनच संपला.
  त्यामुळे माझ्या लेखनातील अल्लड मुलाचा दहशतवादीही असाच बनलेला दाखवला आहे. त्यालाही शेवटी मरायचेच आहे.त्याला आपण फसवले गेल्याची जाणिवही शेवटी झालीच आहे.

  त्यामुळे १०, १०० १००० कितीही दहशतवादी मारुन, इराक अफगाणिस्तान, अगदी पाकिस्तानवर हल्ले करुन, हा प्रश्न सुटणार नाही. दहशतवादी पैदा करणारी यंत्रणा उद्ध्वस्त करणे हे आजच्या संपूर्ण जगासमोरील आव्हान आहे.

  तेव्हा हे निनावी मित्रा, तू मला हे स्पष्टीकरण देण्याची संधी दिलीस ह्याबद्दल तुझे आभार.

  माझ्या लेखनावर येणारे नकारात्मक प्रतिसादही मी प्रकाशित करतो.तू नावानिशी लिहिलेस तर बरे होइल.

  ReplyDelete
 4. lai bhari kale....avadal aplyala....pudhe continue kara.... Good :)
  Prasad.....

  ReplyDelete
 5. मस्त लिहिले आहेस

  ReplyDelete
 6. मस्त लिहिले आहेस

  ReplyDelete
 7. मला ही आवड़ले… :) चालू द्या

  ReplyDelete