November 14, 2008

धन्यवाद

आज मी ब्लॉग लिहायला सुरुवात करुन तीन आठवडे झाले. पण आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे.


मी ब्लॉग लेखनाला तशी बरीच उशीरा सुरुवात केली. मराठीत हजारो ब्लॉग आहेत. लाखो वाचक असणारे ब्लॉग आहेत. अतिशय सरस , सकस साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळतं.ह्यात मी कुठेच नाही ह्याची मला कल्पना आहे. तरी पण एक प्रयत्न करुन बघू म्हणून मी ब्लॉग लेखन सुरु केलं. मी दोन प्रकारचे गणक( हिट काउंटर) लावले . एक फक्त हिट्स मोजतो, ते म्हणजे भेट देणारे लोक. दुसरा गणक हया ब्लॉगावर पुन्हा- पुन्हा येणारे( रिटर्नींग) तसेच यूनिक वाचक मोजतो. हे वाचक ठरवण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. ते तुम्हाला
इथे वाचायला मिळू शकतील ह्यांनी काही ना काही वाचन केलेले असते.

तर ही वाचक संख्या आता १००० चा आकडा ओलांडून गेली आहे.एवढया कमी कालावधीत माझ्या ब्लॉगला भेट देणारयांची संख्या १६०० पार करुन गेली. त्यापैकी १००० जणांनी कोणता न कोणता लेख वाचला.

मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा इतक्या लवकर वाचकांचा आकडा १००० पार होइल असं वाटलं नव्हतं. मुदलात आपलं लेखन कितपत आवडेल असा प्रश्न होता.

पण तुम्ही मला सांभाळून घेतलं, माझा हुरुप वाढवणारया प्रतिक्रिया दिल्या, आपल्याला जे आवडलं नाही ते ही सांगितलं. आपल्या स्नेहामुळे हे शक्य झालं.

आपल्या सर्वांचे आभार किती आणी कोणत्या शब्दांत मानू ते मला कळत नाहीसं झालं आहे. य़ापुढेही मी माझ्या परीने चांगले लेखन देण्याचा प्रयत्न करीत राहिन. माझ्यावर असाच लोभ ठेवा. माझा ब्लॉग वाचत रहा. मला माझ्या चुका दाखवत रहा.

धन्यवाद
!!

1 comment:

  1. प्रिय कपिल,
    तू असाच लिहित गेलास तर स्वत:चा असा वाचक वर्ग नक्कीच तयार करशील यात शंका नाही मित्रा... आपल्या मातीत रुजलेले मन हे बहरणारच! त्याला अमेरीकेत जाऊन खतपाणी मिळाले असेल एवढेच! लहानपणीच्या आठवणींपासून सुरुवात केली आहेसच तर कॉलेज मधील आठवणीही लवकरच वाचायला मिळतील ना? लेका... लिहीत रहा... हसत रहा...

    ReplyDelete